When I am "Hero" of my Dream
सहसा ती अशा जाती धर्माच्या फंद्यामध्ये पडत नाही, तिला वाटतं कि सर्व माणूस जाती एकच आहे... आदिवासी होता माणूस तेव्हा तर त्याला खाऊ काय हे हि माहित नव्हतं, जात पात कुठून कळल्या काय माहित...
असो. मुद्दा असा आहे कि, हिंदू मुस्लिम युध्द चालू होतं कि काय माहित? खूपच काही तरी खराब चालू होत... ती तिला जमेल तितकी हिरोगिरी करत होती... सर्वांना वाचवायचा प्रयत्न करत होती... पलीकडच्या गल्ली मधून पळत कुठे तरी गेली... दुश्मनला चुकवण्यासाठी तिने त्यांचाच एक माणूस मुद्दाम बांधून ठेवलं होत आधीच... पलीकडच्या गल्लीच्या पलीकडे मोठी सभा काय रंग लावतेय हे तिला लवकरात लवकर बघणे जास्त गरजेचं होतं, ती पळत होती... लोकांच्या गर्दीतून वाट काढत जोरात पळत होती... मुस्लिमांची ती गल्ली भीती दाखवणारी होती... कधी बॉम्ब पडेल काही सांगण्यासारखं नव्हतं... तरी ती निर्भीड पणे पळणं पसंत करून सर्वांना वाचवायचं हेच तिच्या मनात होतं... काय होणार होतं त्या ओसाड डोंगरापलीकडे भरगच्च मोठ्या सभेमध्ये? उंच उंच पायऱ्या, धिप्पाड रक्षक, न घाबरता ती उंच पायऱ्या चढत रक्षकांना मारत, पुढे पुढे जात होती...
Comments
Post a Comment